शासनाने दि. 19 ऑक्टोंबर 2018 रोजीच्या शासनिर्णयाव्दारे केंद्र शासनाच्या असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधियिम, 2008 अंतर्गत विशिष्ट योजनांचा लाभ देण्याकरीता महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरीता महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळाअंतर्गत “लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना” लागू करण्यात येत आहे.
या योजनेतर्गंत प्राथमिक टप्प्यामध्ये विविध प्रशासकीय विभागाच्या अतर्गत सुरु असलेल्या घर बांधणी जसे इंदीरा आवास योजना, शबरई आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजना, रमाई नागरी/ ग्रामीण आवास योजना; सामाजिक न्याय विभागातर्गत वृध्दाश्रम योजना; शिक्षण विभागा मार्फत राबविण्यात येणा-या शैक्षणिक योजना लाभ ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वयोगट | योजना | विस्तृत माहिती |
---|---|---|
१८ ते ५० | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | कोणत्याही कारणाने असंघटीत कामगाराचा मृत्यू झाल्यास रु. 2,00,000/- चे विमा संरक्षण मिळेल. |
१८ ते ७० | प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना |
|
५१ ते ५९ | कन्व्हर्जड आम आदमी विमा योजना (फक्त पूर्वी आम आदमी विमा याजने अतर्गत नोंदीत कामगारांकरीता) |
|
१८ ते ५९ | शिक्षण सहाय्य योजना | “कन्व्हर्जड प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना” व “कन्व्हर्जड आम आदमी विमा योजना” लागू असलेल्या असंघटीत कामगारांच्या मुलांना शिक्षणाकरीता शिक्षण सहयोग योजनेंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी किंवा आय. टी. आय. कोर्स करीत असल्यास व दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास दर तिमाही करिता रु. 300/- रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता) नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल द्वारे दिली जाणार आहे. |