उद्दिष्ट
राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने मंजूर केलेल्या विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून असंघटित क्षेत्रातील कामगारांचे राहणीमान उंचावण्याकडे लक्ष देणे
दृष्टीकोन
- असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे.
- असंघटित क्षेत्रातील निम्नतर घटकांपर्यंत पोहोचून त्या क्षेत्रातील कामगारांकरिता कल्याण योजना राबविणे.
- असंघटित क्षेत्राला सेवा पुरविताना प्रक्रियांचे सुसूत्रीकरण करणे व त्यात पारदर्शकता बाळगणे.
- कार्यक्षम सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा उभी करणे.
लक्ष्य
- असंघटित क्षेत्रातील कामगार निश्चित करून त्यांचा समावेश विविधविषयक योजनांचे लाभार्थी म्हणून करणे.
- असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविणे.
- राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने मंजूर केलेल्या विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून असंघटित क्षेत्रातील कामगारांचे राहणीमान उंचावण्याकडे लक्ष देणे.
- विविध प्रकारचे रोजगार व स्वयं-रोजगार करणा-या कामगारांचे राहणीमान, कल्याण व सामाजिक दर्जा यांविषयी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणे.
- असंघटित क्षेत्रातील कामगारांचे एकूण राहणीमान व सामाजिक दर्जा उंचावणे.