असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमाच्या कलम 6 (1) अन्वये राज्य शासने दि. 03 एप्रिल 2018 रोजीच्या अधिसुचने अन्वये महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ गठीत केले आहे.
गृह उद्योग करणारा कामगार, स्वयंरोजगार करणारा कामगार किंवा असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारा कामगार किंवा संघटीत क्षेत्रातील कामगार भरपाई कायदा, 1923 औद्योगिक विवाद अधिनियम, 1947 कर्मचारी राज्य विमा अधिनियम, 1948 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम, 1952 प्रसूतीलाभ अधिनियम, 1961 आणि उपदान प्रदान अधिनियम, 1972 लागू नसलेला कामगार.